मुंबई प्रतिनिधी - सध्या मनोरंजन विश्वात लग्न सराई सुरु झाली आहे. एकामागे एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतच रणदीप हुड्डाने त्याची प्रियकर

मुंबई प्रतिनिधी – सध्या मनोरंजन विश्वात लग्न सराई सुरु झाली आहे. एकामागे एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतच रणदीप हुड्डाने त्याची प्रियकर लिन लैशरामसोबत लग्न केले तर मराठी विश्वात अमृता देशमुखने अभिनेता प्रसाद जवादेसोबत लग्नगाठ बांधली.आता पुन्हा एक लोकप्रिय कपल लग्न बंधनात अडकले आहे. ‘का रे दुरावा’ आणि ‘अंजली’ या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी लग्न केले आहे चालो नाचो! दीदींना भाईजान अन् महेश भट्टनं नाचवलं, ममताजींनी धरला ठेकादोघांनीही गुपचूप लग्न केले आहे आणि सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत चाहत्यांना ही गोड बातमी देत सुखद धक्का दिला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी एका आश्चर्याचा धक्का देणारी होती.पियुष आणि सुरुची यांनी ‘अंजली’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. दोघेही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील आणि तितकच लोकप्रिय कलाकार आहेत. पियुष आणि सुरुचीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
COMMENTS