चेन्नई : डीएमडीके पक्षाचे संस्थापक, राजकीय नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. गुरुवारी चेन्नईमध्ये त्यांचे निधन

चेन्नई : डीएमडीके पक्षाचे संस्थापक, राजकीय नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. गुरुवारी चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, नंतर ते व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. ते 71 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून लवकरच डीएमडीके कार्यालयात नेण्यात येणार आहे. ‘कॅप्टन’ म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे विजयकांत यांची प्रकृती याआधी नोव्हेंबरमध्ये बिघडली होती. त्यावेळी त्यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
COMMENTS