Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी - आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या एका मित्राला

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दापाश
राहुरीत गोल्डन ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार
२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकु – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई प्रतिनिधी – आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या एका मित्राला आदित्य हा मृतावस्थेत आढळला, त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

आदित्य सिंह राजपूतने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे कुटुंब उत्तराखंड येथील आहे. आई,वडील, एक मोठी बहीण असं आदित्यचं कुटुंब आहे. आदित्यच्या मृत्यूनं मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. ‘स्प्लिट्सविला’ या शोमध्ये आदित्य सिंह राजपूतने काम केले होते. तसेच त्यानं काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. अभिनेता आदित्य सिंह राजपूत हा त्याच्या अंधेरी भागातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.आदित्य हा सोशल मीडियावर अॅक्टिव होता. तो वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करत होता. त्याला इन्स्टाग्रामवर 520K फॉलोवर्स आहेत. आदित्यनं काल इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होती. या फोटोवर ‘संडे फंडे विथ बेस्टी’, असं लिहिलं होतं. ही आदित्यची शेवटी इन्स्टाग्राम पोस्ट ठरली.

COMMENTS