अहमदनगर/प्रतिनिधी ः विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारु धंद्यावर छापे टाकून भिंगार पोलिसांनी 71 हजार रुपयांचा मुद्द
अहमदनगर/प्रतिनिधी ः विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारु धंद्यावर छापे टाकून भिंगार पोलिसांनी 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
या बाबतची माहिती अशी की भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापुरवाडी शिवारतील ब्रम्हतळे, व कापुरवाडी येथे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापे टाकून भाऊसाहेब मुरलीधर पवार ( वय 62 वर्षे रा. कापुरवाडी ता.नगर ) यांचे राहते घराचे आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे आंबट उग्र वासाचे कच्चे रसायन, तसेच संतोष गोवर्धन पवार ( रा. ब्रम्हतळे,कापुरवाडी शिवार, ता.नगर ) याचे राहते घराचे आडोशाला छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे आंबट उग्रवासाचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट केली आहे . या कारवाईत एकूण 71 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. या बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, यांचे मार्गदर्शना खाली उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, पोलिस उप निरीक्षक दिनकर मुंडे, एम के बेंडकोळी, पोलिस हवालदार अजय नारायण नगरे, पोलिस हवालदार आर के दहीफळे, पोलिस हवालदार आर. एस. मिसाळ, पोलिस नाईक जी एस साठे, पोलिस नाईक आर आर द्वारके, पोलिस नाईक दिलीप प्रकाश शिंदे यांनी केली आहे.
COMMENTS