Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नायब तहसीलदारासह दोघांवर लाचलुचपतप्रकरणी कारवाई

सांगली / प्रतिनिधी : आष्टा, ता. वाळवा येथील तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारासह दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. नायब तहसीलदार

कोंडवे येथील गाडे वाड्याला आग; घरातील साहित्य जळून नुकसान
फलटण शहरात विनामास्क फिरणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा
वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही स्वराने गाठली गुणांची शंभरी; दहिवडी कन्या शाळेतील कु. स्वरा टकले हिने दहावी परिक्षेत मिळवले 100 टक्के गुण

सांगली / प्रतिनिधी : आष्टा, ता. वाळवा येथील तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारासह दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील (वय 52), महसूल सहाय्यक सुधीर दीपक तमायचे (वय 37) यांच्यावर आष्टा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून मिळणेबाबत तक्रारदारांनी आष्टा अपर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी नायब तहसीलदार बाजीराव पाटील, महसूल सहाय्यक सुधीर तमायचे यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतचा तक्रार सोमवार, दि. 21 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली. विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली. यामध्ये पाटील व तमायचे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले.
आज ( दि. 22) अपर तहसीलदार कार्यालय आष्टा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. कार्यालयात बाजीराव पाटील व तमायचे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांवर आष्टा पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS