पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे हद्दीत गंभीर गुन्हे करणार्या साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवानसह त्याच्या इतर 11 साथीद
पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे हद्दीत गंभीर गुन्हे करणार्या साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवानसह त्याच्या इतर 11 साथीदारांच्या गुन्हेगारी टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंर्तगत ही 18 वी कारवाई आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे रिक्षा प्रवासी वाहतुक करण्याकरता प्रवाशांची वाट पाहत थांबलेले असताना टोळी प्रमुख लतिफ बागवान (वय-23,रा.कात्रज,पुणे) व त्याचे इतर 11 साथीदारांनी संघटित टोळी तयार करुन तक्रारदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी धारदार शस्त्राने डोक्यात, दोन्ही हाताच्या मनगटावर , पाठीवर वार करुन गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपींवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रेहान शेख (19), अब्दुलअली जमालउद्दीन सैय्यद (19), संकेत किशोर चव्हाण (18), ऋतिक चंद्रकांत काची (21) यांना अटक केली. तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. उर्वरित सहा आरोपी पसार झालेले असून त्यांचा पोलिस शोध घेत आहे.
COMMENTS