Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करावी

कोपरगाव ख्रिस्ती समाज संघटनेची मागणी

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हे देहू आळंदी येथील

मल्टीस्टेट म्हणजे खासगी सावकारी व घटनाविरोधी : पालकमंत्री मुश्रीफांचा दावा
प्रशासकांच्या नाकर्तेपणामुळे नगर अर्बन बँकेवर निर्बंध
सात वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा लावला शोध… | DAINIK LOKMNTHAN

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हे देहू आळंदी येथील ख्रिस्ती धर्माच्या प्रभु भोजन या धार्मिक विधीमध्ये व्यत्यय आणून ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावनांचा अनादर करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करणेबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माच्या पवित्र शास्त्रमधील लोककृत्व पुणे देवाची आळंदी येथील गवळी नावाच्या कुटुंबाच्या घरात पवित्र प्रभू भोजनाचा विधी चालू असताना काही समाजकंटकांनी सदरच्या घरात घुसून प्रभू भोजन विधीचा अनादर करून हे येशूचे रक्त आहे. हे आम्हाला सिद्ध करा म्हणून पवित्र भोजनात विधी करू दिला नाही. सदरचे समाजकंटकांनी आमचे प्रभोधन विदेश अंधश्रद्धेचे स्वरूप देऊन व धर्मांतर असे शब्द वापरून महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती समाजाविषयी द्वेष भावना पसरवण्याचे काम केले. अशा समाजकंटकांवर  गुन्हे दाखल करून शासन करावे व भक्ती स्थळे व ख्रिस्ती धर्मगुरू या सर्वांना पोलिस संरक्षण मिळावे असे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन निवेदन देताना राजन त्रिभुवन अध्यक्ष, रेडी फर्नांडिस उपाध्यक्ष, रवी सोनवणे सचिव, सचिन बोरुडे, फादर प्रमोद बोधक, पालक अजय भोसले, सिस्टर मेरी करवालो, सिस्टर जोईलेट, आशिष खर्चे, ब्रदर्स योगेश कोपरे, अशोक नायडू सुनील लोंढे, राहुल तोरणे, जॉन कदम, जॉन गोरे, रेखा दिवे यांच्यासह कोपरगाव तालुक्यातील ख्रिस्ती समाज बांधव  उपस्थित होते.

COMMENTS