नवी दिल्ली : समन्वयाने काम करून भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा यूट्यूब वाहिन्यांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षा
नवी दिल्ली : समन्वयाने काम करून भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा यूट्यूब वाहिन्यांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या वाहिन्यांद्वारे पसरवल्या जाणार्या खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी 100 हून अधिक तथ्य-तपासण्यांचा समावेश असलेल्या सहा वेगवेगळ्या ट्विटची मालिका फॅक्ट चेक कक्षाने जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाची ही अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे या कारवाईच्या माध्यमातून संपूर्ण वाहिन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
COMMENTS