अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील अवैध वाळू चोरी व वाहतूक विरुध्द कारवाई करुन एक विटकरी रंगाचा टेम्पो व एक ब्रास वाळु असा एकुण 3 लाख 10 हजार

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील अवैध वाळू चोरी व वाहतूक विरुध्द कारवाई करुन एक विटकरी रंगाचा टेम्पो व एक ब्रास वाळु असा एकुण 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नेवासा तालुक्यात केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक नेमून अवैध वाळू चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने नेवासा पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळू चोरी व वाहतूक करणार्या ठिकाणी छापा टाकुन एकुण तीन लाख किंमतीचा एक मालवाहतूक टेम्पो व 10 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी लक्ष्मण बहिरुनाथ पवार (वय 35, रा. गंगानगर, ता. नेवासा) अरुण गोंजारी, (पूर्णनाव माहित नाही. रा.नेवासा बुा,ता.नेवासा ) यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक,राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमारी स्वाती भोर , श्रीरामपूर, उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, श्रीरामपूर विभाग, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
COMMENTS