Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेशिस्त वाहन चालकांवर हदगाव पोलीस प्रशासनाचा कारवाईचा दंडूका

22 हजार 500 रुपयांचा दंड वसूल , लोकमंथन बातमीचा परिणाम

हदगाव प्रतिनिधी - मुख्य रस्त्यावर बेशिस्त पार्कींग करणार्या वाहनचालकांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे. बातमी प्रकाशित करताच पोलीस विभागाकडून कारवाई

नाशिक तालुका शेतकी संघाच्या संस्थापक सभासदांना न्याय देणार – मा.खासदार देविदास पिंगळे
टाळेबंदीमुळे 1419 कर्मचार्‍यांना काढले ; जनरल मोटर्सचा निर्णय; कामगार संघटना आक्रमक
ऑटोग्राफनंतर एमएस धोनीने चाहत्याकडून मागितले चॉकलेट

हदगाव प्रतिनिधी – मुख्य रस्त्यावर बेशिस्त पार्कींग करणार्या वाहनचालकांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे. बातमी प्रकाशित करताच पोलीस विभागाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवार रोजी दिवसभरात 44 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून 22 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात बेशिस्त पार्कींगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मुख्य रस्त्यावरव नागरिक बेशिस्तपणे वाहने पार्कींग करीत असल्याने सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच अतिक्रमण धारक दुकाने, बस स्थानकासमोरील फळ विक्रेत्यांकडून देखील रस्त्यावर दुकाने थाटली जात असल्याने ते देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शुक्रवारी पोलीस निरीक्षक जगनाथ पवार यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखेचे इम्रान खान पठाण, गृहरक्षक दलाचे कदम या कर्मचार्यांच्या पथकाने तहसील कार्यालय ते उपजिल्हा रुग्णालय या मुख्य रस्त्यावरील वाहनांवर कारवाई केली. बेशिस्त पार्कींगसह नो पार्कींगमध्ये वाहने लावणार्यांवर कारवईचा बडगा उगारण्यात आला. यात अपे ऑटो, मॅजिक, ट्रिपल सीट,मोटरसायकल, अश्या 44 वाहनांवर कारवाई करण्यता आली.तसेच त्यांच्याकडून सुमारे 22500 हजार रुपये दंड देखील वसुल करण्यात आला असून ही कारवाई आत दररोज केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पो. कॉ. इम्रान पठाण यांच्या कडून देण्यात आली आहे.

COMMENTS