कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील मुर्शतपूर येथे अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन हायवा एक जेसीबी तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या नेतृत्त्व

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील मुर्शतपूर येथे अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन हायवा एक जेसीबी तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने जप्त केले आहेत. या कारवाईने अवैध गौण खनिजाचे विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईमध्ये कोपरगांव तालुक्यातील मुर्शतपुर शिवारात अवैधरित्या गौनखनिज (वाळू ) वाहतूक करणारा अंदाजे 20 लक्ष प्रती हायवा प्रमाणे दोन हायवा 40 लक्ष रुपये आणि जेसीबी अंदाजे 20 लक्ष रुपये असे एकूण 60 लक्ष रुपयांची वाहने जप्त केली आहे. तहसीलदार संदिपकुमार भोसले यांचे पथकात तलाठी गटकळ,शिपाई रामदास माळवदे,भाऊसाहेब माळी, कोतवाल साहेबराव रणशूर यांचा समावेश होता. अवैधरित्या गौण खनिज उपसून नेमका कोणत्या बांधकामावर जातो आहे. याची चौकशी आता केली जाणार असल्याचे ही संदिपकुमार भोसले यांनी सांगितले.
COMMENTS