शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे

मुंबई : शिवसेनेला सध्या बंडखोरांचे ग्रहण लागल्यामुळे शिवसेनेकडून बंडखोरांची हकालपट्टी करण्याचे सत्र सध्या राबवण्यास सुरुवात केली असून, माजी खासदार शि

कोरोनाकाळात आरोग्य मंदिरं उघडल्याबद्दल जनता आशिर्वाद देईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
त्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखा
कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा : ठाकरे

मुंबई : शिवसेनेला सध्या बंडखोरांचे ग्रहण लागल्यामुळे शिवसेनेकडून बंडखोरांची हकालपट्टी करण्याचे सत्र सध्या राबवण्यास सुरुवात केली असून, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर काही तासांतच आढाळराव पाटील यांची उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र काही तासानंतरच आढळराव पाटलांनी सारवासारव केल्यानंतर शिवसेनेने ही कारवाई मागे घेतली. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आली. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही तशीच कारवाई करण्यात आल्याचं सामनातून वृत्तानुसार बोलले जात होते. दरम्यान, शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई शिवसेनेकडून मागे घेण्यात आली आहे.शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे म्हटले आहे. तसेच या पोस्टमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

COMMENTS