Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची निर्दोष सुटका

मुंबई ः 1993 साली देशात ठिकठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची गुरूवारी निर्दोष सुटका करण्यात आली. राजस्थानम

शेतकरी आंदोलन सुरूच ; शंभू बॉर्डरवर गोंधळ
होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू
भाजपला बोध

मुंबई ः 1993 साली देशात ठिकठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची गुरूवारी निर्दोष सुटका करण्यात आली. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टानं हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 31 वर्षांनंतर हा निर्णय आला आहे. टुंडाची सुटका करतानाच न्यायालयानं इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी ठरवलं आहे. त्या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बाबरी मशीद पतनानंतर 1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊमध्ये काही रेल्वे गाड्यांमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करीम टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे. अब्दुल करीम टुंडा हा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो पिलखुवा इथे सुतारकाम करायचा. अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. मशिदीतील एका कार्यक्रमाच्या वेळी पाइप गनने चालवल्यामुळे अब्दुल करीमला एक हात गमवावा होता. तेव्हापासून त्याचे नाव टुंडा पडले होते. टुंडाला 1993 च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी बनवण्यात आले होते.

COMMENTS