Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीएसएनएलचे अच्छे दिन सुरू ; 30 लाख जोडले नवे ग्राहक

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल ही सरकारी कंपनी नेहमीच आर्थिक तोट्यात असल्यामुळे सरकारकडून सातत्याने या कंपनीला आर्थिक मदत क

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भाजप का करतेय विखे पिता पुत्रांच्या आर्थिक घोटाळ्याकडे दुर्लक्ष ?
चांद्रयानमुळे अवकाश खुले

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल ही सरकारी कंपनी नेहमीच आर्थिक तोट्यात असल्यामुळे सरकारकडून सातत्याने या कंपनीला आर्थिक मदत करावी लागायची. मात्र आता या कंपनीला अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अलिकडेच केलेल्या दरवाढीनंतर मोठ्या संख्येने ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत.
दूरसंचार नियामक अर्थात ट्रायच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये कमी दर आणि 4-जी सेवांचे ‘सॉफ्ट लाँच’ हे देखील आहे. बीएसएनएलने जुलैमध्ये सुमारे 30 लाख नवीन ग्राहक जोडले तर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. यात प्रामुख्याने एअरटेलने 17 लाख युजर्स गमावले, तर व्होडाफोन आयडियाने 14 लाख आणि जिओने 8 लाख युजर्स गमावले आहे.

COMMENTS