Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक

पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात

पुणे ः पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांनी मंगळवारी अल्पवयीन आरोपीच्या वडिलाला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणीनगर परि

पपया नर्सरी बनला अवैध धंद्याचा अड्डडा
धर्मांतर बंदी कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

पुणे ः पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांनी मंगळवारी अल्पवयीन आरोपीच्या वडिलाला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणार्‍या वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणी पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल केला होता. मात्र यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथके तैनात केली होती. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली आहे.विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवालने पुण्यात पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यामध्ये दुचाकीवरील तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते. दरम्यान, या अपघातानंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. गदारोळानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली होती.

आमच्यावर कोणाचाही दबाव नाही ः पोलिस आयुक्त अमितेश कुमार – आमच्यावर कोणाचाही दबाव नसून कडक कारवाई करणे हीच आमची भूमिका असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. अमितेश कुमार म्हणाले, रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. पहिला अर्ज आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि दुसरा रिमांड होमचा. मात्र दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले.  हा अत्यंत गंभीर गुन्हा असून यामध्ये 304 कलमांतर्गत  सात वर्षापेक्षा जास्त  शिक्षा आहे. त्यांचे वय हे 16 वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे  बालन्याय कायद्यानुसार प्रौढ म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मद्य पिऊन रहादारीच्या रस्त्यावर वेगाने वाहन चालवणे हा अतिशय गंभीर गुन्हा असल्याचे अमितेशकुमार यांनी म्हटले आहे.

हॉटेल कोझी व ब्लॅकला ठोकले टाळे – पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघात या प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी गंभीरपणे घेतली आहे. पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर एक्साईज विभागाने कारवाई करत हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅकला टाळे ठोकले आहे. तसेच गुन्ह्यातील महागडी पोर्श गाडी ही मुंबईतील डिलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता गाडी विशाल अगरवाल यांना दिली. त्यामुळे डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवर कारवाई होणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

COMMENTS