Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची शिक्षा 

यवतमाळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

यवतमाळ प्रतिनिधी- अल्पवयीन मुलगी मैत्रीणीसह शिकवणी वर्गाला जात असताना तिचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची शिक्षा व एक ह

अहमदनगर मर्चंटस् सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेची कारणे दाखवा नोटीस ; एक कोटी दंडाची टांगती तलवार
पोलिस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथीलता
बनावट ओळखपत्र बनविणा़र्‍यांचा धंदा तेजीत

यवतमाळ प्रतिनिधी– अल्पवयीन मुलगी मैत्रीणीसह शिकवणी वर्गाला जात असताना तिचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला.

जावेद उर्फ गोलू रफिक खान, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी ही मैत्रीणीसोबत शिकवणीला जात असताना सदर तरुण पाठलाग करायचा. 18 जून 2019 मध्ये चार महिन्यापूर्वीपासून हा प्रकार सुरू होता. छेडखानीचा त्रास असह्य झाल्याने विद्यार्थीनीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सोपान पाटोळे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील निती दवे यांनी बाजू मांडली.

COMMENTS