हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला आज सुनावणार शिक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला आज सुनावणार शिक्षा

वर्धा/प्रतिनिधी ः वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आरोप सिद्ध झाले असून, कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले असून, याप्

दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार ?
Nagpur : पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात | LOKNews24
आमदार प्रा. राम शिंदेंनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा

वर्धा/प्रतिनिधी ः वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आरोप सिद्ध झाले असून, कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले असून, याप्रकरणी गुरूवारी न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावणार आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. कोर्ट आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
पोलिसांकडून याप्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी आणि 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होत आले आहे. हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी 40 टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. आरोपीला बुधवारही सकाळी 11.30 वाजता चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आले आहे. आता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती सरकारी वकील अ‍ॅड उज्वल निकम यांनी दिली आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून होत होती.

COMMENTS