बीड प्रतिनिधी - विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपी निलेश देशमाने व शारदाबाई देशमाने यांची बीड येथील मा. सातवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निय
बीड प्रतिनिधी – विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपी निलेश देशमाने व शारदाबाई देशमाने यांची बीड येथील मा. सातवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी नियमित फौजदारी केस क्रमांक 213/2014 मध्ये पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादीने दि. 14-12-2013 रोजी पोलीस स्टेशन, नेकनूर येथे तक्रार दिली की, दि. 14-12-2013 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास आरोपीचे जनावरे शेतातून हाकलून दिल्याच्या कारणावरून विनयभंग करून मारहाण केली. या फिर्यादीवरून निलेश देशमाने व शारदाबाई देशमाने यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन, नेकनूर येथे गु.र.क्र.179/2013 हा भा.दं.वि.चे कलम 354, 323, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन, नेकनूर यांनी तपास करून आरोपींचे विरूद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. परंतु आरोपींचे विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. सदर प्रकरणात अँड. कपील पी. भैरट व अँड.के.आर.गवळी यांनी आरोपींच्या वतीने घेतलेला बचाव व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून बीड येथील मा.सातवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी निलेश देशमाने व शारदाबाई देशमाने यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपींचे वतीने अँड. कपील पी. भैरट व अँड. के. आर. गवळी यांनी काम पाहीले.
COMMENTS