Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

राहाता ः राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे गावामध्ये 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारस गणपत संभाजी कोळगे वय 80 वर्ष यांना त्यांचा मुलगा अनिल गण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आ. रोहित पवारांनी घेतली भेट
घरकुल आवास योजनेअंतर्गत ८० घरकुलांना मंजूरी
संगमनेरात परराज्यातील 69 लाखांची दारू जप्त

राहाता ः राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे गावामध्ये 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारस गणपत संभाजी कोळगे वय 80 वर्ष यांना त्यांचा मुलगा अनिल गणपत कोळगे वय 53 वर्ष याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून ते राहत असलेला घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला होता.
याप्रकरणी राहाता पोलिस स्टेशनला गु.र.नं. 300/2024 ’मा.द.वि. क.302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पो.नि. सोपान काकड हे करीत होते. सदर गुन्हयातील फरार आरोपी अनिल गणपत कोळगे वय 53 वर्ष रा. को-हाळे ता. राहाता हा गुन्हा केल्या पासून फरार होता. 28 जून 2024 रोजी सकाळी 10.10 वाजेच्या सुमारास आरोपी हा अस्तगाव फाटा येथे येणार असल्याची गोपनीय बातमीदाराकडून पोना विनोद गंभीरे यांना मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती पो. नि. सोपान काकड यांना देताच त्यानी तात्काळ पोना गंभीरे व पो.कॉ शिंदे यांना सदर ठिकाणी पाठवण्यात आले. त्या ठिकाणी अंमलदार यांनी तेथे जावून सापाळा लावुन बसले असता काही वेळाने आरोपी तेथे पायी चालत आल्याने त्यास हटकताच तो पळू लागल्याने पोलिस पथकाने ताब्यात घेतले व त्यास पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाणेत आणून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुशंघाने सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदरची कारवाई  राकेश ओला, पोलिस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबमें, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी. शिरीष वमने. शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शना खाली, पो. नि. सोपान काकड, पो.स.ई कमलाकर चौधरी, पोहेकॉ विशाल पंडोरे, पोहेकॉ श्रीकांत नरोडे, पोना विनोद गंभीरे, पोकॉ संभाजी शिंदे, आधी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS