Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतसंस्था उन्नतीकडे नेण्यासाठी जबाबदारी ही महत्वाची ः हभप उध्दवजी महाराज

नेवासाफाटा : नेवासा येथील लघूउद्योजकांनी एकत्रित येत सुरू केलेल्या ज्ञानमोहिनी पतसंस्थेचे उदघाटन सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख गुरुवर्

वाहतूक नियंत्रणासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर
कुस्ती स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाचे यश
कांस्यपदकांसह खेळाडूंनी जिंकली मनं l DAINIK LOKMNTHAN

नेवासाफाटा : नेवासा येथील लघूउद्योजकांनी एकत्रित येत सुरू केलेल्या ज्ञानमोहिनी पतसंस्थेचे उदघाटन सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री उद्धवजी महाराज महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्थेमध्ये ठेवलेली ठेव ही आपली नाही ते दुसर्‍याचे धन आहे याचे भान पतसंस्था चालवितांना ठेवणे गरजेचे असून पतसंस्थेला उन्नतीकडे न्यायचे असेल तर सचोटी प्रेम जिव्हाळा आपुलकी बरोबरच जबाबदारी ही महत्वाची असल्याचे प्रतिपादन हभप उध्दवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.

    यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई आदर्श मल्टिटेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे आप्पा हे होते तर गोणेगाव चौफुला येथील रामकृष्णा श्रमाचे प्रमुख महंत हभप भगवान महाराज जंगले शास्त्री, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, स्व.लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, इंजिनिअर सुनीलराव वाघ, डॉ. लक्ष्मणराव खंडाळे,कृष्णाजी डहाळे, अँड. काका गायके, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, दत्तात्रय कांगुणे, अशोक महाराज बर्डे, सुधीर जामदार, सुदामराव मंडलिक, ज्ञानमोहिनी पतसंस्थेचे चेअरमन निवृत्ती पाटील बर्डे, उपाध्यक्ष दत्तात्रय तागड, मॅनेजर जितेंद्र सचदेव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ज्ञानमोहिनी पतसंस्थेचे चेअरमन निवृत्ती पाटील बर्डे यांनी आलेल्या मान्यवरांचे व संत महंतांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. नेवासा शहरात सर्व कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, लघु उद्योजक व्यापारी यांनी एकत्रित येत ही पतसंस्था स्थापन केली गरजवंतासह उपेक्षित घटकांला स्व:तच्या पायावर उभे कसे करता येईल यासाठीपतसंस्था उभी करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना महंत उध्दवजी महाराज मंडलिक म्हणाले की बर्‍याच पतसंस्था अशा आहेत की त्यांनी लोकांचे धन आपले मानले त्यामुळे अनेक पतसंस्था डबघाईस गेल्या, पतसंस्थामधील ठेवलेली ठेव तिची जपवणूक तिची सुरक्षा ही जबाबदारी मानून सचोटीने व्यवहार केल्यास पतसंस्थाचा उत्कर्ष दूर नाही,त्यासाठी पतसंस्था चालकांनी जबाबदारी समजून प्रेम जिव्हाळा आपुलकी यांची सांगड घालून काम करावे आवाहन करून त्यांनी व्यापारी लघु उद्योजक यांनी एकत्रित येत सुरू केलेल्या ज्ञानमोहिनी पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या.

साई आदर्श मल्टीटेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी ज्ञानमोहिनी पतसंस्थेला मार्गदर्शन करत राहू अशी ग्वाही देत चांगल्या कामांच्या माध्यमातून पतसंस्थाना उत्कर्षाकडे नेण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित हितचिंतकांच्या वतीने ज्ञानमोहिनी पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात येऊन वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यापारी सुरेश चुत्तर, सुधीर जामदार, मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल लहारे, माजी सरपंच सतीश गायके,लक्ष्मण दाणे, राजेंद्र परदेशी, समाधान गायकवाड, रमहूशेठ पठाण, आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी बाळासाहेब सोनवणे,रखमाजी नाचन,भिकाजी खोसे, शेजुळ साहेब, अनिल शिर्के, अंबादास कांगुणे, शिवाजी बर्डे, सुभाष बर्डे, तुकाराम बर्डे, संचालक विठ्ठल साळुंके, संतोष लगड, चंद्रकांत सुरडे, भीमराज तौर, छगन गायकवाड,अँड. मयूर वाखुरे, गणेश कोरेकर, नितीन गायकवाड, रविंद्र गवळी, संचालिका सौ. सुभद्राबाई बर्डे,कमलबाई कराडे यांच्यासह व्यापारी, कष्टकरी, शेतमजूर, लघु उद्योजक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर पतसंस्थेचे मॅनेजर जितेंद्र सचदेव यांनी आभार मानले.

COMMENTS