Homeताज्या बातम्यादेश

एनडीए सरकारची खातेवाटप जाहीर

राजनाथ सिंह, अमित शहा, गडकरी यांच्याकडे पुन्हा तीच खाती

नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ स्वीकारल्यानंतर सोमवारी कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध निर्ण

उर्वशी रौतेलाने मागितली रिषभ पंतची माफी
 ज्ञानगंगा अभयारण्यात झाले दोन बिबट्याचे दर्शन
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा- भाई मोहन गुंड

नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ स्वीकारल्यानंतर सोमवारी कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध निर्णय घेतल्यानंतर एनडीए सरकारच्या 71 मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. राजनाथ सिंह यांच्याकडे दुसर्‍यांदा संरक्षण मंत्रालय तर अमित शहा यांच्याकडे दुसर्‍यांदा केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय देण्यात आले आहे. मात्र यावेळी त्यांच्याकडे माहिती प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. एस जयशंकर यांना देखील पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर निर्मला सितारमण यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्री पद देण्यात आले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍या टर्म सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत पहिली कॅबिनेट बैठक घेतली. ज्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते –
अमित शहा – गृह मंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
नितीन गडकरी- रस्ते वाहतूक मंत्री
अश्‍विनी वैष्णव- रेल्वे मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री
एस जयशंकर- परराष्ट्र मंत्री
मनोहरलाल खट्टर – ऊर्जा मंत्री
श्रीपाद नाईक – शहरी विकास – राज्यमंत्री
शिवराज सिंह चौहान – कृषी मंत्री
निर्मला सितारमण – अर्थ मंत्री
जीतन राम मांझी – केंद्रीय लघु उद्योग मंत्री
पियूष गोयल – वाणिज्य मंत्री
भूपेंद्र यादव – पर्यावरण मंत्री
चिराग पासवान – क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
ज्योतिरादित्य शिंदे – दूरसंचार मंत्री
जे. पी नड्डा – आरोग्य मंत्री
हरदीप पुरी – पेट्रोलियम मंत्री
अजय टमटा- रस्ते वाहतूक – राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा- रस्ते वाहतूक – राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब नियोजन – राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालय – राज्यमंत्री
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण-राज्यमंत्री
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण – राज्यमंत्री

COMMENTS