Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये तीन जवानांचा अपघाती मृत्यू

श्रीनगर, : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात बुधवारी सकाळी खोल दरीत पडून एका अधिकार्‍यासह तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटन

प्रजासत्ताक दिनादिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
आसाम सरकारने घातली गोमांसावर बंदी
विवाहितेवर अत्याचार करणार्‍या माजी सैनिकाला कारावास

श्रीनगर, : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात बुधवारी सकाळी खोल दरीत पडून एका अधिकार्‍यासह तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेच्या वेळी हे जवान नियंत्रण रेषेवर गस्त घालत होते.
याबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये खोल दरीत पडल्यामुळं एक जेसीओ आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाला. जेसीओ आणि इतर दोन जवान माछिल सेक्टरमध्ये नियमित गस्त घालत असताना तिघंही खाली दरीत कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने ट्विट करत सांगितले की, दुर्गम भागात नियमित गस्त घालत असताना एक जेसीओ आणि इतर दोन जवान बर्फातून पाय घसरुन खोल दरीत कोसळले आणि यात त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वी गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला माछिल सेक्टरमध्ये अशीच घटना घडली होती. हिमस्खलनात तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS