Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन मुलींसह जावयाचा अपघाती मृत्यू

मालेगाव ः वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या 2 मुलींसह जावयाचा उभ्या कंटेनरला कार आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे माल

नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई
लग्न मोडल्यानं पोलिसाला नैराश्य ? गळफास घेत आत्महत्या! | LOK News 24
९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मालेगाव ः वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या 2 मुलींसह जावयाचा उभ्या कंटेनरला कार आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यालगत घडली आहे. मीनाक्षी अरुण हिरे (53, रा. टिटवाळा, ठाणे), अनिशा विकास सावंत (40) व विकास चिंतामण सावंत (45, ठाकुर्ली, जि. ठाणे) अशी या मृतांची नावे आहेत. वैभवी प्रवीण जाधव (17, रा.नाशिक) ही तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नाशिक स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS