मौत का कुआ’ स्टंटदरम्यान दुर्घटना, स्टंट करताना अचानक गाड्या कोसळल्या.

Homeताज्या बातम्यादेश

मौत का कुआ’ स्टंटदरम्यान दुर्घटना, स्टंट करताना अचानक गाड्या कोसळल्या.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल अपघातात दोन जण जखमी.

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh) तील अमरोहा(Amroha) जिल्ह्यातील एका जत्रेतील अपघाताचा व्हायरल व्हिडीओ आहे.“मौत का

दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर अजित पवार गटाचा सवाल?
ओ माय गॉड 2 या चित्रपटाचा टीझर रिलीज

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh) तील अमरोहा(Amroha) जिल्ह्यातील एका जत्रेतील अपघाताचा व्हायरल व्हिडीओ आहे.“मौत का कुआ”( well of death) सारखे स्टंट आपण लहानपणापासून जत्रेत बघत आलोय. या स्टंट दरम्यान झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. मौत का कुआ मध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी अचानक खाली जमिनीवर कोसळल्या आणि त्यानंतर जमिनीवर पडलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावर कार कोसळली. या अपघातात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मौत का कुआ मध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

COMMENTS