Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खंबाटकी घाटात अपघात; दोन ट्रक जळून खाक

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत वाढ झाली असतांना, रविवारी पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात

पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावात दारूबंदी करावी
या माजी क्रिकेटरची लाखो रुपयांची फसवणूक | LOKNews24
आजोबांकडून नातीला यकृत दान

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत वाढ झाली असतांना, रविवारी पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे या मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. पुण्याहून सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ही थांबवण्यात आली आहे. ही घटना रविवारी एक वाजेच्या सुमारास घडली.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पुण्याहून एक मालवाहू ट्रक हा सातार्‍याच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणार्‍या ट्रकला हा ट्रक धडकला. या भीषण अपघातात एका ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणाच्या आत दोन्ही ट्रक हे आगीत भस्मसात झाले. आगीने भीषण रूप धारण केले. यामुळे या मार्गावरची वाहतूक ही थंबवण्यात आली. रस्त्याच्या मध्येच हे ट्रक पेटल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. खंबाटकी घाटातील दत्त मंदीरासमोर हा अपघात झाला. ट्रक पेटल्याने पुण्याहून सातारा बाजूने जाणारी वाहतूक ही थांबवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक ही पोलिसांनी बोगद्यामार्गे वळवली आहे. परिणामी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून हळू हळू वाहतूक पूर्व पदावर आणण्यासाठी वाहतूक पोलिस प्रयत्न करत आहेत.

COMMENTS