Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेचा निर्णय मान्य; यापुढील आयुष्य जनतेच्या सेवेसाठी : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिवर्तनासाठी प्

सुज्ञ जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल : निशिकांत भोसले-पाटील
सातारा जिल्हा परिषदेच्या 15 शाळा आदर्श बनविणार : ना. शंभूराज देसाई
सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिवर्तनासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले. मी गेल्या पाच वर्षापासून अखंड मतदारांच्या सेवेत राहीलो. झालेला निसटता पराभवावर चिंतन करुन यापुढे तेवढ्याच ऊर्जेने व सेवाभावनेतुन सर्वाना बरोबर घेऊन काम करणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा तेवढ्याच चांगल्या विचाराने हातात हात घालून सर्वांना बरोबर घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी, जनतेच्या न्याय, हक्कासाठी आपण लढत राहाणार आहोत. या निवडणूकीत मतदार बंधु, भगिनींनी मतदानाच्या माध्यमातून दिलेला निर्णय मान्य आहे. यापुढील माझे आयुष्य आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल. महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींचे मनपुर्वक आभार.

COMMENTS