Homeताज्या बातम्यादेश

तिरुपती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये झुरळांचा धुमाकूळ

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीहून तिरुपतीसाठी निघालेल्या रेल्वेच्या एसी कोचमध्ये झुरळांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशा

संघर्ष, समन्वय आणि संयम!
वाशिममध्ये पंतप्रधान मोदींनी 23 हजार कोटींच्या उपक्रमांचा केला शुभारंभ
राज्यात अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीहून तिरुपतीसाठी निघालेल्या रेल्वेच्या एसी कोचमध्ये झुरळांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशांने झुरळांच्या कळपाचा फोटो ट्विटरवर शेयर करत संताप व्यक्त केला आहे. सीट आणि बेडवर झुरळांनी संचार केल्याने अनेक प्रवाशांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे.
तिरूपती एक्सप्रेसच्या एसी कोचमधील स्वच्छता आणि देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यानंतर आता रेल्वेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. याशिवाय रेल्वेतील झुरळांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. दिल्लीहून तिरुपतीला निघालेल्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये आतिफ अली नावाचे प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या सीटभोवती झुरळ फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतकेच नाही तर सीट, बेडशिट आणि बॅगांमध्येही झुरळे शिरली. झुरळ झोपूच देत नसल्याने आतिफ यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. कारण झोप लागताच सगळी झुरळे अंगावर येत असल्याचे आतिफ यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी रेल्वेच्या सीटवरील आणि भिंतीवरील झुरळांचा फोटो शेयर करत कुठे आहे स्वच्छता?, असा सवाल केला आहे. त्यानंतर रेल्वेकडूनही त्यांना तातडीने उत्तर देण्यात आले आहे.  

COMMENTS