मुंबई प्रतिनिधी - समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी(Abu Azmi) यांच्याशी संबंधित 20 ते 22 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापेमारी केली आहे. मात्र, य
मुंबई प्रतिनिधी – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी(Abu Azmi) यांच्याशी संबंधित 20 ते 22 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापेमारी केली आहे. मात्र, या कारवाईबाबत आपल्याला अद्याप तरी काहीही माहिती दिली नसल्याचे अबू आझमी यांनी सांगितले आहे. मंगळवारी सकाळपासून अबू आझमींविरोधात प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरू आहे. अबू आझमी यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनींशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी केली जात असल्याचे समोर आले आहे. मुंबई, लखनऊसहीत उत्तर प्रदेश तसेच अनेक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे.
बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधी ही कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे. कुलाब्यातील कमल मेंशन या इमारतीत प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. या ठिकाणी अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे कार्यालय आहे. तर वाराणसीत विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात छापेमारी झाली. आरोप करण्यात आला आहे की, अभा गुप्ताद्वारे कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुप देखील प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहे. प्राप्तिकर विभागाने हवाला ऑपरेटर्सकडे छापेमारी केली आहे.

COMMENTS