Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिंबे माणिकडोह बोगदा रद्द झाल्यास लाभक्षेत्रातील शेतीचे वाळवंट होईल ः  घनश्याम शेलार

श्रीगोंदा : डिंबे माणिकडोह बोगदा झाल्यास लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी मिळेल परंतु दिलीप वळसे पाटील यांनी हा बोगदा रद्द करावा यासाठी माग

बसअभावी विद्यार्थ्यांना बघावी लागते तासनतास वाट
Belapur : चोरी करायला गेले… लग्नाचा अल्बम पाहून मागितले दागिने… बेलापूरात धुमाकूळ (Video)
वारकर्‍यांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी नियोजन करा

श्रीगोंदा : डिंबे माणिकडोह बोगदा झाल्यास लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी मिळेल परंतु दिलीप वळसे पाटील यांनी हा बोगदा रद्द करावा यासाठी मागणी केली आहे या गंभीर प्रश्‍नावर तालुक्यातील पदसिद्ध नेतेमंडळी गप्प का आहेत असा सवाल घनश्याम शेलार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.
बाळासाहेब थोरात यांना या प्रश्‍ना बाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, तसे पत्र दिल्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आली अद्याप निर्णय झालेला नाही परंतु दिलीप वळसे पाटील यांच्या मागण्या गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या मान्य झाल्या तर खाली कालव्यांमध्ये पाणी येणार नाही.  लाभक्षेत्रातील पिढ्यानपिढ्या बरबाद होतील. 9512 हेक्टर सिंचन क्षेत्र असलेला कुकडी प्रकल्प आहे त्यामध्ये श्रीगोंदा 30 हजार हेक्टर, कर्जत 29 हजार हेक्टर तर करमाळा 24 हजार हेक्टर एवढ्या मोठ्या स्वरूपाचा भाग या पाण्यावर अवलंबून असतो त्यामुळे हा प्रश्‍न खूप गंभीर स्वरूपाचा आहे. या प्रश्‍नाबाबत खासदार शरद पवार व आमदार रोहित पवार यांनी लक्ष घातल्यास विषय मार्गी लागेल बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके यांनाही संपर्क झाला आहे डिंबे माणिकडोह बोगदा झालाच पाहिजे यासाठी लाभक्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून डिंबे माणिकडोह बोगदा व्हावा हा मोठा प्रश्‍न असताना ज्यांच्या जबाबदार्‍या आहेत त्यांनी लक्ष घातले नाही लोकप्रतिनिधींना गांभीर्य नाही तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी पदसिद्ध असणार्‍यां नेत्यांनी हे काम करावे. घनश्याम शेलार

COMMENTS