कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील कुडाळ येथील सांजवात शिक्षण संचलित मनमंदिर मतिमंद मुलांच्या कार्यशाळेला आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टकडून शालेय

कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील कुडाळ येथील सांजवात शिक्षण संचलित मनमंदिर मतिमंद मुलांच्या कार्यशाळेला आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत या दिव्यांग शाळेला मदत म्हणून झेरॉक्स मशीन, प्रिंटर भेट देण्यात आला. तसेच मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी खाऊ घेतल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद पाहिला मिळाला.
यावेळी आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष वंदना वाघमारे, सचिव मेघा महादेव शिंदे, खजिनदार प्रतिक शिंदे, सांजवात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा सांजवात शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक आनंदा मोहिते पाटील, माजी सरपंच जितेंद्र शिंदे, संदीप सावंत, विजय कुंभार, अमोल शिंदे, पिंपळबन अध्यक्ष महेश पवार, विकास जाधव, ऋषिकेश शिंदे, ऋतिक शिंदे, अजीम पठाण, नयन पवार, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS