Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम् आदमी पार्टीची बैठक उत्साहात संपन्न

निफाड- निफाड तालुक्यात विविध प्रकरच्या कार्यात कायम अग्रेसर असणारे आम् आदमी पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनखाली बैठक घेण्यात

नांदेड मध्ये गाडीचा काच फोडून चोरट्यांकडून 50 लाख लंपास | LokNews24
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क
सहाय्यक फौजदाराची झुंज अपयशी ;सेवानिवृत्तीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना निधन

निफाड- निफाड तालुक्यात विविध प्रकरच्या कार्यात कायम अग्रेसर असणारे आम् आदमी पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनखाली बैठक घेण्यात आली. निफाड येथील गेस्ट हाऊस मध्ये आयोजित बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामंचायती व तहसील संबंधी येणाऱ्या अडचणी व तालुक्यातील दुष्काळाबाबत पिकांच्या नुकसानिबाबत गाओगावतील आलेल्या आम् आदमी पार्टीच्या सदस्यांनी अधिक माहिती समजुन घेतली.तसेच गावा – गावातील अतिक्रमण सारख्या विषयामधून उद्भवणाऱ्या जातीवादी प्रश्न कश्या प्रकारे बाजूला ठेऊन विधायक कामे कसे पूर्ण करता येतील व भविष्यात येणाऱ्या निवडणुकीने कसे सामोरे जाता येईल.आम् आदमी पार्टीच्या मदतीने व लोकशाही पद्धतीने आपले हक्क कसे मिळवावेत याबद्दल रूपरेषा  ॲड. वायचले साहेब यांनी सांगितले. बैठकीत मा. आमदार अनिल कदम यांनीही अचानक सहभाग घेतल्याने बैठकीला एक नवे स्वरूप आले,त्यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक करताना सर्वांनी पक्ष भेद जातीवाद विसरून काम करण्याचे आवाहन केले. बैठकीस अल्ताफभाई शेख,अमोल लांडगे,दत्ता पवार (कामगार जिल्हाअध्यक्ष),रवींद्र गोसावी , नारायण खुले(सिन्नर तालुका अध्यक्ष), धनंजय वाघ(निफाड तालुका उपाध्यक्ष ),अनिल शिंदे(संघटक निफाड तालुका),सुनील घोडके (शहर अध्यक्ष विंचूर) अब्जलभाई शहा (उपशहरध्यक्ष विंचूर), तुकाराम वाघ,रुस्तम पठाण (, सदस्य) यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

COMMENTS