अहमदनगर - राहत्या घरात गळफास घेऊन १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. श्रीकांत मच्छिंद्र कोहोक (वय १९ रा. आदित्य कॉलन

अहमदनगर – राहत्या घरात गळफास घेऊन १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. श्रीकांत मच्छिंद्र कोहोक (वय १९ रा. आदित्य कॉलनी, सावेडी) असे मयत युवकाचे नाव आहे.
श्रीकांतने त्याच्या राहत्यां घरात गळफास घेतला. याची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच त्याचे वडील मच्छिंद्र कोहोक यांनी त्याला उपचारासाठी रात्री पावणे दहाच्या सुमारास येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. तशी माहिती रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलिसांना दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी सी आर पी सी १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, श्रीकांत च्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस अंमलदार प्रदीप बडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलीस अंमलदार संजीवनी नेटके करत आहेत.
COMMENTS