Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जानापुरी नजीक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात पिंपरणवाडी येथील युवक ठार

लोहा प्रतिनिधी - नांदेड - लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जानापुरी नजीक लोह्याकडून नांदेड कडे जाणार्‍या टीप्परने नांदेड कडून लोह्याकडे जाणार्‍या मो

रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्या चिमुकल्याला कारने चिरडले
एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू

लोहा प्रतिनिधी – नांदेड – लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जानापुरी नजीक लोह्याकडून नांदेड कडे जाणार्‍या टीप्परने नांदेड कडून लोह्याकडे जाणार्‍या मोटारसायकलीस जबर धडक दिली त्यात बावीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला. सदर घटना दि. 2 रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडली.
लोहा तालुक्यातील पिंपरणवाडी येथील शिवाजी जाधव (वय 22) हा तरुण खाजगी काम आटोपून मोटारसायकल क्र. एम एच 26 बी यू 9489 वरून दि 2 रोजी दुपारी नांदेड वरून गावी परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील जानापुरी नजीक दुपारी तीन वाजता दरम्यान सोनखेडहुन नांदेडकडे मुरूम घेवून जाणार्‍या केटीआयएल कंपनीचा टीप्पर क्र. एम एच 42 बी एफ 1618 ने मोटरसायकलीस जबर धडक दिली त्यात मोटारसायकलस्वार शिवाजी जाधव हा जागीच ठार झाला. याप्रकरणी उपरोक्त टीप्पर चालकांविरुध सोनखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS