लोणावळा प्रतिनिधी : ऐनवेळी प्रियकर किंवा प्रेयसीकडून लग्नास नकार मिळाल्यावर अनेकजण नैराश्यात जातात. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना हे सगळं सहन ह
लोणावळा प्रतिनिधी : ऐनवेळी प्रियकर किंवा प्रेयसीकडून लग्नास नकार मिळाल्यावर अनेकजण नैराश्यात जातात. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना हे सगळं सहन होत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना लोणावळ्यातून समोर आली आहे. लोणावळ्यातील रामनगर येथे प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. परभणी येथील तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्या सारखे टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीवरुन लग्नास नकार मिळाल्याने तिने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती लोणावळा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळं लोणावळ्यातील रामनगर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.

COMMENTS