Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पुणे: पोलिस भरतीची तयारी करणार्‍या तरुणीवर तिला भरती करून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली

मराठी असू तर बोलूही मराठीच ‘आईच्या गावात मराठीत बोल’
चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.
आरक्षणप्रश्‍नी मराठा आंदोलक आक्रमक

पुणे: पोलिस भरतीची तयारी करणार्‍या तरुणीवर तिला भरती करून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चंद्रशेखर प्रधान (वय 27, रा. सय्यदनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका 31 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पीडित तरुणी पोलीस भरतीची तयारी करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही वानवडीतील एका संस्थेत जायची. तेथे तिची आरोपी प्रधानशी ओळख झाली होती.

COMMENTS