Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अनेक वेळेस बलात्कार

पुणे ः अगोदर लग्न झालेले असतांना देखील लग्न झाले असल्याचे लपवून ठेवत एका तरूणाने विवाह विषयक वेबसाईट जीवनसाथी डॉटकॉम यावरुन एका तरुणीशी ओळख निर्म

लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच आणि गोरगरीब जनेतेचे देणंघेणं नाही त्यांना फक्त राजकारण करायचे:- गोकुळ दौड
अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी : उदय सामंत
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

पुणे ः अगोदर लग्न झालेले असतांना देखील लग्न झाले असल्याचे लपवून ठेवत एका तरूणाने विवाह विषयक वेबसाईट जीवनसाथी डॉटकॉम यावरुन एका तरुणीशी ओळख निर्माण केली. त्याने 32 वर्षीय तरुणीस वेळोवेळी लग्न करणार असल्याचे खोटे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली. त्यावेळी तरुणाने तिचा बेकायदेशीर गर्भपात करुन तिच्याशी लग्न न करता तिला धमकावत तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पिडित तरुणीने आरोपी रचित संतोष गोयल (वय-34, रा. घोरपडी, पुणे) याचे विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार एप्रिल 2018 ते 19 डिसेंबर 2023 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, तक्रारदार तरुणीची आरोपी सोबत विवाह विषयक वेबसाईटवर ओळख निर्माण झाली. त्याने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून तिच्याशी पुणे व उत्तरप्रदेश मधील वेगवेगळया हॉटेल मध्ये तिला घेऊन जात शरीरसंबंध केले. त्यामुळे तरुणी गर्भवती राहिल्याने तिला बळजबरीने दवाखान्यात घषऊन जावून तिचा गर्भपात करुन तिची फसवणुक केली. तिने त्याच्यासोबत शारिरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता, त्याने त्याचे मोबाईल मध्ये काढलेले दोघांचे शारिरिक संबंध करतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत , तुला काय करायचे ते कर असे सांगून तिला धमकावल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे. तर दुसर्‍या एका घटनेत कोंढवा परिसरातील एका 28 वर्षीय तरुणीचे नातेवाईक आनंद सोनवणे यांनी फेसबूकवर तरुणीस मेसेज करुन तिचा पाठलाग कला. तिला फेसबूकवर अश्‍लील व्हिडिओ, अश्‍लील डॉक्युमेंट, अश्‍लील लिंक व अश्‍लील फोटो पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तरुणी, तिची बहिण व तिचा भाऊ यांची आनंद हा घरी येऊन माफी मागणार असल्याचे सांगत घरी आला व त्याने तरुणी दरात उभी असताना, तिला घराबाहेर ओढून तिचा विनयभंग केला. तसेच तिचा भाऊ याने त्यास घरात जाऊन बोलू असे सांगितले असता, त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

COMMENTS