Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव टँकरच्या धडकेत तरूणीचा मृत्यू

कात्रज चौकातील कोंढवा रस्त्यावर अपघात

पुणे ः कात्रज चौकातून कोंढवा रस्त्याने व्हेस्पा दुचाकी (एमएच 12 युजी 8335) वरुन जात असलेल्या 24 वर्षीय तरुणीस कात्रज चौकातील कोंढवा रस्त्याचे कॉर

रावणाचं दहन करताना झाला मोठा अपघात
एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
खड्डय़ांमुळे तीन चाकी मालवाहू टेम्पो पलटला.

पुणे ः कात्रज चौकातून कोंढवा रस्त्याने व्हेस्पा दुचाकी (एमएच 12 युजी 8335) वरुन जात असलेल्या 24 वर्षीय तरुणीस कात्रज चौकातील कोंढवा रस्त्याचे कॉर्नरवर कात्रज चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात टँकरने भीषण धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यु झाला आहे. मानसी रमेश पवार (वय-24, रा. आंबेगाव पठार,पुणे) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी अज्ञात टँकर चालक विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई विठ्ठल एकनाथ चिपाडे यांनी तक्रार दाखल केली आहे. मयत मानसी पवार ही कात्रज चौकातून कोंढवा रस्त्याने तिच्या दुचाकीवर जात होती. त्यावेळी कात्रज चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या सदर अनोळखी टँकरने तिच्या दुचाकीस पाठीमागून जोरात धडक दिली. टँकर चालकाने अविचाराने, हयगवीने, रहादारीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवून सदर दुचाकीस धडक देऊन अपघातात जबर जखमी करुन तरुणीच्या मृत्युस कारणीभूत होऊन दुचाकीचे नुकसान केले आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहे.

COMMENTS