सलून चालकाने दाढी करायच्या वस्त्र्यानेच चिरला तरुणाचा गळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलून चालकाने दाढी करायच्या वस्त्र्यानेच चिरला तरुणाचा गळा

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील धक्कादायक घटना

नांदेड  प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडलेल्या दोन हत्येच्या घटनांनी एकच खळबळ माजलीय. दाढी करण्यासाठी गेलेल्या एकाची भांडणातून हत्य

भारतीय महिला संघाने पाकिस्तानला चारली धूळ
जय आनंद महावीर युवक मंडळाचा आज 28 वा महाप्रसाद सोहळा
ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल ; खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर

नांदेड  प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडलेल्या दोन हत्येच्या घटनांनी एकच खळबळ माजलीय. दाढी करण्यासाठी गेलेल्या एकाची भांडणातून हत्या करण्यात आली. सलून चालकासोबत तरुणाचा वाद झाला आणि दाढी करायच्या वस्त्र्यानेच गळा चिरुन 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर अज्ञात जमावाने तरुणाची हत्या केल्याच्या रागात सलून विक्रेत्याचाही खून केला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दोन्ही हत्याकांडाचा थरार संध्याकाळी घडला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

COMMENTS