Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावतांना चक्कर आल्याने आयटी कंपनीतील तरूणाचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भूगावमध्ये घडली. हर्षद चंद्रशेखर पिंगळे (वय 39, रा. स्काय मानस लेक,

’साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ः भागवत मुठे पाटील
ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना
लग्नाच्या दिवशीच नवरीने घेतला जगाचा निरोप

पुणे/प्रतिनिधी ः धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भूगावमध्ये घडली. हर्षद चंद्रशेखर पिंगळे (वय 39, रा. स्काय मानस लेक, भुकूम, ता. मुळशी) असे मृत तरुणाचे नाव असून तो आयटी कंपनीत काम करत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हर्षद चंद्रशेखर पिंगळे हा तरुण भूगाव परिसरात राहतो. भूगाव ते चांदणी चौक आणि तेथून पुन्हा भूगावपर्यंत धावण्याचा सराव करीत आले होते. भूगावला आल्यावर त्यांना चक्कर आल्यामुळे ते खाली पडले. त्यावेळी तेथून जाणार्‍या एका टेंपोचालकाने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापुर्वीच हर्षद पिंगळे यांना मृत घोषित केले.

COMMENTS