Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव वेगातील कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सारोळा कासार येथील घटना

अहमदनगर : भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला.ही घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात खडकी

टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू

अहमदनगर : भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला.ही घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात खडकी ते सारोळा कासार रस्त्यावरील दरे मळा फाट्याजवळ घडली. अखिलेश कुमार दुलार चरण राय (यादव) (वय ३१, मुळ रा. बिहार, हल्ली रा. सारोळा कासार ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या बाबतची माहिती अशी की अखिलेश कुमार हा गेल्या काही दिवसांपासून सारोळा कासार परिसरात कामाला होता. तो गावातच राहात होता. शनिवारी सायंकाळी त्याच्याकडील दुचाकीवरून खडकी ते सारोळा कासार रस्त्यावरून जात असताना दरे मळा फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या कार चालकाने अखिलेश कुमार याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अखिलेश कुमार याचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मयत अखिलेश कुमार राय यांचा भाऊ पंकज कुमार दुलार चरण राय (यादव) ( वय २२, मुळ रा. बिहार, हल्ली रा. बार्शी, जि. सोलापूर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कार वरील अज्ञात चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी माने करीत आहेत.

COMMENTS