Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकर

नववर्षाच्या प्रारंभीच औंध येथे कुस्तीचा थरार
लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार जाहीर
बारामतीची स्वप्ने दाखविणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : निशिकांत भोसले-पाटील

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज संजय माने (वय 24) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दि. 10 जानेवारी 2026 रोजी रात्री साधारण 8.30 वाजण्याच्या सुमारास कुकुडवाड-मायणी रोडवर कुकुडवाडपासून पुढे अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. सुरज संजय माने (वय 30, रा. म्हसवड) हा आपल्या दुचाकीवरून खटाव-माण अ‍ॅग्रो शुगर फॅक्टरी, पडळ येथे ड्युटीस जात होता. त्याच्या पुढे भारत विठ्ठल शिंदे (रा. ढाकणी, ता. माण) हा ट्रॅक्टर तसेच दोन उसाने भरलेल्या ट्रॉलींसह जात होता. चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने ट्रॉली जोडणारी पिन तुटली. त्यामुळे मागील दोन्ही उसाने भरलेल्या ट्रॉली अचानक रस्त्यावर सरकून मागून येणार्‍या सुरज माने यांच्या दुचाकीवर आदळल्या. या जोरदार धडकेत सुरज माने हे ट्रॉलीखाली गंभीररित्या दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतरही चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीने सांगितले.
मृताचा भाऊ धीरज संजय माने (वय 33, रा. म्हसवड) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार चालक भारत विठ्ठल शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अपघाताची हवालदार खाडे तपास करत आहेत.

COMMENTS