औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गणेश सुभाष मुसळे अ
औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गणेश सुभाष मुसळे असे मृत तरुणाचे नाव आहे.गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यापासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणून खुप दिवसांपासून तगादा लावला होता.तसेच शेजारी घर असल्याने प्रत्यक्षात भेटून सुद्धा या गोष्टी सदरील महिला बोलत असल्याने या सगळ्या गोष्टीच्या मानसिक ताणाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS