Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तृतीय पंथीयाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या

औरंगाबाद ः लग्नासाठी तरूणावर दबाव टाकत सारखी पैशांची मागणी करीत तुझ्या घरी माझ्या बिरादरीच्या लोकांना आणून गोंधळ घालून तुझी बदनाम करेन, अशी धमकी

मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी केला शंखनाद
गौताळा अभयारण्यात 15 सप्टेंबरपर्यंत बंदी
समृद्धी महामार्ग तब्बल ५ दिवस राहणार बंद

औरंगाबाद ः लग्नासाठी तरूणावर दबाव टाकत सारखी पैशांची मागणी करीत तुझ्या घरी माझ्या बिरादरीच्या लोकांना आणून गोंधळ घालून तुझी बदनाम करेन, अशी धमकी देणार्या तृतिपंथीयाच्या त्रासाला कंटाळून एका चोवीस वर्षीय तरूणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. रांजणगाव शेणपूंजीतील कमळापुर रस्त्यावरील सावतानगर भागात घडली. सागर बाबुराव कोंगळे (वय 24, रा.न्यु. हनुमानगर, गारखेडा) असे आत्महत्या करणार्या तरूणाचे नाव आहे.
न्यु हनुमाननगर भागातील सागर कोंगळे हा वाळुज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत कामाला होता. दोन महिन्यांपूर्वी तो ओएसीस चौकात ज्युस पिताना त्याची ओळख एका तृतियपंथीसोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, त्यातून दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर मागील दिड महिन्यांपासून सागर हा त्या तृतियपंथीसोबत सावतानगर येथेच राहत होता. सुरूवातील काही दिवस तृतीयपंथी सागर सोबत चांगला वागला. मात्र काही दिवसांपासून तृतीयपंथी हा सागरकडे पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे सागरने त्याला आतापर्यत तीस हजार रूपये देखील दिले. त्यानंतरही तृतीयपंथीकडून पैशांची मागणी सुरूच होती. तसेच त्या तृतीयपंथाने सागरकडे मागील आठ दिवसांपासून लग्नासाठी तगादा लावला होता. दरम्यान, सागरने त्याला नकार दिला. त्यांनतर तृतीयपंथीने त्याला माझ्यासोबत लग्न नाही केले, तर माझ्या बिरादरीतील साथीदारांना घेऊन तुझ्या घरी येऊन गोंधळ घालू, तुझी बदनामी करू अशी धमकी दिली. त्यामुळे सागर हा तणावात होता. त्यातूनच त्याने चिठ्ठी लिहुन रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास तृतीपंथीच्या घरीच छताच्या पंख्याला दोरीच्या सह्याने गळफास घेतला. ही घटना कळाल्यानंतर तृतीयपंथी व आणखी एकाने सागरला बेशुद्ध अवस्थेत घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास सागरला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलिस हवालदार तांदळे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS