युक्रेनचे विदेश मंत्री कुबेला यांनी युरोपीय देशांचे डोळे उघडताना एक स्पष्ट गोष्ट समोर आणली, जर रशियाची सरशी झाली तर, युरोपीय देशांच्या गल्ल्यांमध
युक्रेनचे विदेश मंत्री कुबेला यांनी युरोपीय देशांचे डोळे उघडताना एक स्पष्ट गोष्ट समोर आणली, जर रशियाची सरशी झाली तर, युरोपीय देशांच्या गल्ल्यांमध्ये युद्धाचे प्रसंग येतील. अर्थात, यामधून त्यांनी मुत्सद्दीपणा करताना दोन बाबी अधोरेखित केल्या आहेत; एक म्हणजे युरोपियन देशांनी सातत्याने युक्रेनला युद्ध सामग्रीची मदत करावी आणि दुसरं म्हणजे रशिया हा कमकुवत झाल्याचा आभास ते युरोपियन देशांना करून देत असल्यामुळे युरोपीय देशांनी थेट रशियाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे जगासमोर अधोरेखित केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी आगामी काही दिवसातच डोनाल्ड ट्रम्प हे सूत्र घेणार असल्यामुळे युकेन आणि रशिया युद्धात ते मध्यस्थी करतील; किंबहुना, युक्रेनला फार मोठी मदत करतील, अशी एक प्रकारची भाबडी अपेक्षा युक्रेनच्या विदेश मंत्र्यांना आहे. याचा अर्थ, जगाच्या एकूणच लढ्यामध्ये युरोपीय देश आणि अमेरिकन देशांच्या विरोधात उर्वरित जग असू शकते, हेही त्यांना वाटत असावे. त्यामुळे, त्यांनी थेट युक्रेनला युरोपीय देशांनी मदत करावी अशी रट लावली. जगासमोर आता हा मोठा पेचप्रसंग आहे. युक्रेन आणि रशिया इस्त्राईल आणि पॅलेस्टिन हे युद्ध, जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवते आहे काय? असा प्रश्न पडलेला आहे. त्याच वेळी जगाचं अर्थशास्त्र पूर्णपणे बदलले आहे. आशियाई देशांचं अर्थशास्त्र चीनच्या अधिपत्यात आणि उर्वरित जगाचं मुस्लिम राष्ट्रांच्या अर्थविश्वावर विसंबून राहायला लागले आहे. अशा काळात विकसित असलेले युरोपीय देश आर्थिक दृष्ट्या मागे जात आहेत का? असाही प्रश्न आता जगासमोर पडलेला आहे. अनेक युरोपिय देश आता गल्फ देशांकडे आपले करार घेऊन पुढे येत आहेत. युरोपीय भांडवलदारांच्या मर्यादा जिथे संपत आहेत तिथून मुस्लिम राष्ट्रांचा पैसा उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केला जातो आहे. जगाने लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. कारण, जग आता विकसित असलेल्या युरोप आणि अमेरिकन देशांपेक्षा मुस्लिम देशांच्या भांडवलावर अधिक विसंबायला लागले आहे. अशा वेळी गल्फ देशांच्या भूमीवर इस्त्राइल आणि पॅलेस्टीन हे युद्ध होत असताना आणि दुसऱ्या बाजूला आपला शस्त्र संभार चा व्यापार करणारा युरोप आणि अमेरिका हे देश युक्रेन-रशिया युद्धात काही मुत्सद्दी भूमिका पार पाडतो का? हे देखील आता जगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण झालेले आहे. कारण, या दोन युद्धांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेच्या संतुलनावर होतो आहे. जगाचा आर्थिक समतोल कोसळण्याच्या स्थितीत आहे. अशावेळी युक्रेनच्या विदेश मंत्र्यांचे आलेले हे निवेदन एक प्रकारे जगाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करणारेच आहे. त्यांनी युद्धाच्या संदर्भात भाष्य केलेलं असलं तरी, तो आर्थिक तणावातून निर्माण झालेला प्रश्न आहे; ही स्पष्टोक्ती एक प्रकारे त्यांच्या विधानातून मिळते. त्यामुळे, जग आता आर्थिक दिवाळखोरीच्या स्थितीत येऊन पहोचले आहे काय, असा विचार आता प्रत्येकाच्या मनात येतो आहे. त्यामुळे, अमेरिकन अर्थव्यवस्था ही मंदीत अडकलेची चर्चा आता जागतिक पातळीवर होते आहे. क्रिसमस आणि नववर्ष या पर्वावर विदेशी गुंतवणूकदार नेहमीच आपला पैसा भाग बाजारातून काढत असतात. परंतु, सध्याची मंदी ही केवळ भाग बाजारावर विसंबून नाही तर, जगाची उत्पादन व्यवस्थाच कमकुवत झाली आहे. त्यामुळे, जगाचा मध्यवर्गही कमकुवत झाला आहे. त्याची खरेदी शक्ती ही कमकुवत झाली आहे. याचा अर्थ, जगाची अर्थव्यवस्था ही कोसळलेली नसलेली तरी ती मंदीच्या चपेटामध्ये सापडली आहे. हे अरिष्ट जर वाढत गेले तर जगाला एक मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जाऊ लागू शकते. ही बाब उघड होऊ नये, यासाठी युक्रेनच्या विदेश मंत्र्यांनी विधान केलं आहे. हे युद्धनीती संदर्भात असलं तरी ते आर्थिक चिंता व्यक्त करणार आहे, यामध्ये शंका नाही!
COMMENTS