Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एसएसजीएम’मध्ये सेंद्रिय शेतीबाबत कार्यशाळा उत्साहात

कोपरगाव:रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज (एस.एस.जी.एम.) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा विषय ‘युवक आणि युवतींची सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल’ असा होता. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत नाईकवाडी लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले. या कार्यशाळेसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन  ऍड. भगीरथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सेंद्रिय शेतीची संकल्पना व व्याप्ती स्पष्ट केली. ते म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. शेतकऱ्यांनी मिश्र पिकपद्धतीला महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. सेंद्रिय शेती ही आज केवळ पर्याय नसून मुलभूत गरज बनली आहे. शेतकरी, विद्यार्थी व ग्राहक यांनी सेंद्रिय शेतीचे सक्रियपणे अनुमोदन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “सेंद्रिय शेती ही युवकांसाठी नवी क्षितिजे उघडणारी संधी असून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी शेतीकडे आधुनिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे” असे स्पष्ट केले. प्रास्ताविक  डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले; तर आभार प्रा. महेश दिघे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते व डॉ. सीमा दाभाडे यांनी केले.

कोपरगावला दोन हजार टन युरिया पुरवणार 
ऊसतोड कामगारांच्या मुलांना ब्लॅंकेट वाटप 
आत्मविश्वास मनुष्यास सातासमुद्रापार नेऊ शकतो : काळे

कोपरगाव:रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज (एस.एस.जी.एम.) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा विषय ‘युवक आणि युवतींची सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल’ असा होता. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत नाईकवाडी लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले. या कार्यशाळेसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन  ऍड. भगीरथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सेंद्रिय शेतीची संकल्पना व व्याप्ती स्पष्ट केली. ते म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. शेतकऱ्यांनी मिश्र पिकपद्धतीला महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. सेंद्रिय शेती ही आज केवळ पर्याय नसून मुलभूत गरज बनली आहे. शेतकरी, विद्यार्थी व ग्राहक यांनी सेंद्रिय शेतीचे सक्रियपणे अनुमोदन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “सेंद्रिय शेती ही युवकांसाठी नवी क्षितिजे उघडणारी संधी असून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी शेतीकडे आधुनिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे” असे स्पष्ट केले. प्रास्ताविक  डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले; तर आभार प्रा. महेश दिघे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते व डॉ. सीमा दाभाडे यांनी केले.

COMMENTS