Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप

मेढा : वर्षाताई जवळ यांची दारूविक्री करणार्‍याकडून हिसकावून घेतलेल्या पिशवीतील दारूची पाहणी करताना पोलीस कर्मचारी. कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्

संशयितरित्या फिरणाऱ्या तिघा जणांवर गुन्हे दाखल l LokNews24
राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप
24 फेब्रुवारीपासून जयंत कबड्डी प्रीमियर लीग सुरू : खंडेराव जाधव

कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील मेढा हे मुख्य ठिकाण. सोमवारी आठवडा बाजारात रस्त्यावर उभे राहून अवैद्यरित्या दारू विक्री सुरू होती. जवळवाडीच्या माजी सरपंच वर्षा जवळ ह्या भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. त्यांनी हा प्रकार पहिला. कशाचीही पर्वा न करता या रणरागिणीने स्वतःचा जीव धोक्यात घालून अवैध दारूविक्री करणार्‍यावर झडप घातली. यांच्याकडील देशी दारूने भरलेली पिशवी हिसकावून घेवून पोलिसांच्या स्वाधिन केली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जावलीत तालुक्यातील रणरागिनींनी एकत्र येवून सन 2009 मध्ये संपूर्ण तालुक्यातील दारूची दुकाने बंद करून देशातील पहिला दारू दुकानमुक्त तालुका म्हणून नावलौकीक मिळविला आहे. मात्र, गेले अनेक महिने उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे अवैध दारू विक्रेत्यांनी थैमान घातले आहे.
तालुक्यातील महिलांनी व व्यसनमुक्त युवक संघाने लढा उभारून दारूबंदी करून तालुक्याला नावलौकीक प्राप्त करून दिला. या दारूबंदीनंतर अवैध दारू विक्रेत्यांना कायद्याचा धाक नसल्याने खुलेआम दारूविक्री करण्याचे धाडस हे अवैध दारूविक्रेते करत आहेत.
बाजारदिवशी भाजी-पाला आणण्यासाठी बाजारात गेलेल्या जवळवाडी गावच्या माजी सरपंच सौ. वर्षाताई जवळ यांना मटणाच्या दुकानासमोर दारूच्या बाटल्यांनी भरलेली पिशवी घेवून खुलेआम विक्री करणारा इसम दिसताच त्याच्यावर झडप घालून हातातील पिशवी हिसकावून घेतली. यावेळी हा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला. यात 46 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्या मेढा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आल्या आहेत.

COMMENTS