Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुसज्ज बस स्थानक होणार प्रवाशांसाठी उपलब्ध

आमदार मोनिकाताई राजळे यांचे आश्‍वासन

शेवगाव तालुका ः  महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून नवीन शेवगाव बसस्थानक काम

शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमधील फसवणुकीची चौकशी करा
मताचे राजकारण करणार नाही – मोनिकाताई राजळे
कृषी खात्यातील योजना प्रत्यक्षात उतरवा ः आ. राजळे

शेवगाव तालुका ः  महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून नवीन शेवगाव बसस्थानक कामासाठी निधी मिळाला होता. दरम्यान विरोधी पक्षांचे सरकार सत्तेत आल्याने, सदर कामास स्थगिती मिळाली. महायुतीचे सरकार आल्यावर पुन्हा बस स्थानकाच्या कामाला गती मिळाली आहे. लवकरच सुसज्ज अश्या बसस्थानकाचे काम पूर्णत्वास येऊन प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
         बसस्थानक परिसर काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, भाजपा शहराध्यक्ष बापू धनवडे, भिमराज सागडे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, नगरसेवक सागर फडके, महेश फलके, नितीन दहिवाळकर, गणेश कोरडे, यांच्यासह राजाभाऊ लड्डा, गंगाभाऊ खेडकर, केशव आंधळे, नितीन फुंदे, उमेश धस,अमोल घोलप, गोकुळ घनवट, रविंद्र धोत्रे, सतिश म्हस्के, किरण काथवटे, सुरेश थोरात, नितीन मालानी, विनोद शिंदे, कैलास सोनवणे, मच्छिंद्र बर्वे, आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, विभागीय अभियंता  राशीनकर, स्थानक प्रमुख किरण शिंदे, अदिनाथ लटपटे, इंटक कामगार संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र घुगे, एसटी बँक संचालिका संध्या दहिफळे, कामगार संघटनेचे अरुण गर्जे, जगन्नाथ पवार, प्रकाश खेडकर तसेच  आगारातील वाहक, चालक, कर्मचारी उपस्थित होते. नूतन बसस्थानक कामासाठी 3 कोटी 27 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला. ऑगस्ट 2019 मध्ये या कामाचा शुभारंभ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे शुभहस्ते करण्यात आला. यानंतर सत्तांतर झाल्याने बसस्थानकाचे काम रखडले होते. मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काँक्रिटीकरण कामासाठी निधीची मागणी केली असता, सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सदर कामासाठी 1 कोटी 9 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

शेवगाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार – मराठवाड्याचे प्रवेशद्वार शेवगावची ओळख आहे. श्रीक्षेत्र पैठण, मढी येथील यात्रेसाठी जाणार्‍या येणार्‍या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, येथील आगारातून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, परळी, नांदेड येथे बसची फेर्‍या चालू असतात. शिर्डी, शनिशिंगणापूर, देवगड, नाशिक, मोहटादेवी, भगवानगड, मढी, पैठण, शेगाव, तुळजापूर या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथून जात असतात. आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आहे.

COMMENTS