Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या

नाशिक प्रतिनिधी - नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा ठळकपणे निदर्शनास आले आहे. शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खुनाची घटना घ

दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.
बेंगळुरू टेक फर्मच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकाची माजी कर्मचाऱ्याकडून हत्या
दोन मैत्रिणींच्या मदतीने पतीच्या प्रियसीची केली हत्या

नाशिक प्रतिनिधी – नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा ठळकपणे निदर्शनास आले आहे. शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली आहे. शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील एका भाजी विक्रेत्याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप आठवले असं हत्या झालेल्या युवकाचे नाव असून संदीपवर सहा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने छातीत व पोटात व मानेवर तब्बल 25 पेक्षा  जास्त वार करुन ठार मारल्याची घटना घडली आहे. संदीपच्या या निर्घृण खूनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचे सत्र घडला आहे. त्यामुळं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परिसरातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येची हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, हा खून का व कशासाठी करण्यात आला आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. भरवस्तीत व दिवसाढवळ्या खूनाची घटना घडल्याने नाशकात पोलिसांचा अंकुश उरलाच नसल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. कॅमेऱ्यात कैद झाला थरारसीसीटीव्ही व्हिडिओत हा सगळा थरार चित्रीत झाला आहे. हत्या झालेला युवक रस्त्याच्या कडेला उभा असतानाच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर सपासप वार केले. लोकांची रहदारी सुरू असतानाच टोळक्यांनी युवकावर निर्घृणपणे हल्ला केला. तरुण खाली कोसळेपर्यंत या टोळक्यांनी त्याच्यावर सपासप वार करणे चालुच ठेवले. तरुण खाली कोसळल्यानंतर टोळक्याने तिथून पळ काढला आहे. या बाबत माहिती अशी की .मयत संदिप हा चुलत भाऊ सनी राजू आठवले बरोबर छत्रपती शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पान पुरी खाण्यासाठी आले होते याच वेळी सहा जण दोन चुकीवर आले त्यांनी संदिप प्रकाश आठवले याच्यावर धारदार शस्त्राने पोटात तसेच अंगावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ समवेत अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले . मयत संदिप च्या पश्यात आई वडील बहीण भाऊ परिवार आहे . दरम्यान यातील काही आरोपी ची नावे निष्पन्न झाले आहे त् आरोपीच्या शोधार्थ पोलिस रवाना झाले आहे.

COMMENTS