Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न

जळगाव प्रतिनिधी - शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. वधु वरच्या हस्ते लग्न मंडपातच शेतकऱ्यांना वडाच्या रोपट्य

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 72 उमेदवार रिंगणात
 मोदी सरकारच्या काळात भारताचे उत्त्पन्न दुप्पट
निराधार योजनेचा नाही आधार

जळगाव प्रतिनिधी – शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. वधु वरच्या हस्ते लग्न मंडपातच शेतकऱ्यांना वडाच्या रोपट्या सह बियाणे वाटप करण्यात आले आहे. मुक्ताई नगरमधील अंतूर्ली येथील विवाह सोहळ्याची  संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. जळगावातील एका बियाणे विक्रेत्याने आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात शेतकऱ्यांना चक्क वडाचं रोपटे, अन् बियाण्याचं वाटप करत शेतकऱ्यांची बांधिलकी जोपासली आहे. एकनाथ खडसे यांच्या सह राजकीय तसेच सर्वचं क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती.

COMMENTS