अकोले : आपले कार्य आणि ध्येय यांच्याशी एकनिष्ठ राहून किती नम्रपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे होय .नु
अकोले : आपले कार्य आणि ध्येय यांच्याशी एकनिष्ठ राहून किती नम्रपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे होय .नुकताच दिवाळी सण देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने घरोघरी लक्ष्मीचे पूजन होते. दारोदारी सडा रांगोळ्या व रोषणाई केली जाते. त्याचबरोबर पणत्या आणि दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघतो. अंधारावर प्रकाशानी विजय मिळवण्याचा हा दीपोत्सव असतो. देशातील सर्वात मोठा सण प्रत्येक घरी साजरा होतो. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी सुद्धा दीपावली मोठ्या उत्साहात आपल्या राहते घरी कोंभाळणे , तालुका -अकोले जिल्हा -अहमदनगर येथे साजरी केला. हा उत्सव साजरा करत असताना त्यांनी पारंपरिक बियाणे संवर्धन व त्याच्याशी असलेले आपले नाते किती घट्ट आहे याचे उत्तम उदाहरण घडवले. दिवा तर दारी लागलाच परंतु बियाणेरूपी दिवा आणि नुकतेच शेतात तयार झालेले बियाणे यांची सुंदर आरास तयार करून त्यांची पूजा राहीबाई व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी केली. घरावरती तोरण सुद्धा भाताच्या लोम्ब्यांचे , लक्ष्मीपूजनासाठी , नागली , वरई , खुरसानी व इतर भाजीपाल्यांचे बियाणे शिस्तबद्ध पद्धतीने मांडलेले होते. पूजेसाठी उत्कृष्ट पद्धतीने अस्सल गावठी बियाण्यांची मांडणी केलेली होती. या सर्व गोष्टींचे नीटनेटकेपणाने नियोजन केलेले होते.आपल्या कार्याशी आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रत्येक सणवार सुद्धा तेवढ्याच तत्परतेने साजरा करता येतो याचे त्यांनी उत्तम उदाहरण जगाला दाखवून दिले आहे. याप्रसंगी देशवासीयांना व सीमेवर लढणार्या सैनिकांनाही त्यांनी दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS